Jagdish Patil
आंतरराष्ट्रीय योग दिन
दरवर्षी 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. शारीरिक आणि मानसिक आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी हा दिन साजरा केला जातो.
आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचं श्रेय भारताला जातं. योगाचे महत्त्व जगाला कळावं यासाठी पंतप्रधान मोदींनी 27 सप्टेंबर 2014 ला युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीमध्ये हा दिन साजरा करण्याची संकल्पना मांडली.
मोदींच्या प्रस्तावाला संमती देत जागतिक योग दिन साजरा करण्याचं मान्य केलं. तर यावेळी योग दिन 21 जूनलाच साजरा करण्याचं ठरवलं.
21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो आणि योगाभ्यास दीर्घायुष्य देते. त्यामुळे हाच दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला गेला.
त्यानंतर 1 डिसेंबर 2014 रोजी, संयुक्त राष्ट्रसंघाच्या 177 सदस्यांनी 21 जून हा दिवस "आंतरराष्ट्रीय योग दिवस" म्हणून साजरा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली
महत्वाची बाब म्हणजे मोदींचा हा ठराव 90 दिवसांमध्ये पूर्ण बहुमताने मंजूर केला गेला. सर्वात कमी कालावधीत पूर्ण बहुमताने मंजूर होणारा हा पहिलाच प्रस्ताव ठरला.
PM मोदी यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत 36 हजार लोकांनी 21 जून 2015 रोजी पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त 35 मिनिटं 21 योगासने केल्याची नोंद गिनीज बुकमध्ये झाली आहे.
दरवर्षी योग दिन एका थीमवर साजरा केला जातो. यंदाच्या योग दिनाची थीम 'एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग' ही आहे.