नक्षलवाद्यांशी वाघासारखा लढला अन् अधिकारी बनला, जंगलात अभ्यास करणाऱ्या राजूचं अखेर स्वप्न झालं साकार...

Jagdish Patil

UPSC ची तयारी

UPSC ची तयारी म्हणजे जगापासून लांब आणि जवळच्या लोकांचा संपर्क तोडून, नोकरी सोडून केवळ अभ्यास करणं असा काही लोकांचा समज आहे.

Raju Wagh’s UPSC Journey | Sarkarnama

राजू वाघ

मात्र, आपण आपली नोकरी करत देखील UPSC मध्ये यश मिळवू शकतो. याचं उदाहरण राजू वाघ यांनी निर्माण केलं आहे.

Raju Wagh’s UPSC Journey | Sarkarnama

CRPF कमांडंट

छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त बस्तर भागात CRPF कमांडंट म्हणून काम करत असताना राजू यांनी UPSC तयारी सुरू केली होती.

Raju Wagh’s UPSC Journey | Sarkarnama

स्वत:ला सिद्ध केलं

देशाच्या रक्षणाचे कर्तव्य बजावत अभ्यास केल्याचं फळ राजू यांना मिळालं आणि त्यांनी 2024 च्या UPSC परीक्षेत ऑल इंडिया रँक 871 मिळवत स्वत:ला सिद्ध करून दाखवलं.

Raju Wagh’s UPSC Journey | Sarkarnama

शिक्षण

नाशिक जिल्ह्यातील राजू यांचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे. त्यांनी नवोदय विद्यालय आणि NIT नागपूरमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर 2018 मध्ये UPSC च्या मुलाखती देण्यास सुरुवात केली.

Raju Wagh’s UPSC Journey | Sarkarnama

केवळ अभ्यास

तणावपूर्ण नोकरी करत असतानाही त्यांनी कधीही स्वतःला विचलित होऊ दिलं नाही. पहाटे 4 ला उठून 6 वाजेपर्यंत अभ्यास केल्यानंतर ते ड्युटीवर जायचे. सुट्टीच्या दिवशी पूर्णवेळ अभ्यास करायचे.

Raju Wagh’s UPSC Journey | Sarkarnama

पत्नीची साथ

त्यांना UPSC मध्ये यश मिळण्यामागे त्यांची पत्नी पौर्णिमा वाघ यांचा मोलाचा वाटा आहे. त्या स्वतः एक मुख्य अधिकारी असून दोघे पती-पत्नी एकत्र अभ्यास करायचे आणि एकमेकांना प्रेरणा द्यायचे.

Raju Wagh’s UPSC Journey | Sarkarnama

प्रेरणादायी प्रवास

जर तुमच्याकडे शिस्त, ध्येयासाठी लढण्याची क्षमता आणि एक उत्तम जोडीदार साथ द्यायला असेल तर तुम्ही कठीणातील कठीण आव्हान सहज पेलू शकता, हेच राजू यांचा हा प्रवास शिकवतो.

Raju Wagh’s UPSC Journey | Sarkarnama

NEXT : इस्त्रालयकडून हवाई हल्ले सुरू असतानाच इराणचे नागरिकांना What’s App डिलिट करण्याचे आदेश, पण का?

Iran WhatsApp Ban | Sarkarnama
क्लिक करा