'40 व्या वर्षी 20 व्या वर्षापेक्षा अधिक लवचिक व्हा'; फिटनेस फॉर्म्युला सांगत मोदींनी साजरा केला जागतिक योग दिन पाहा PHOTOS

Jagdish Patil

योग दिन

योग दिनानिमित्त जगभरातील जवळपास 2500 हून अधिक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे.

PM Modi International Yoga Day | Sarkarnama

थीम

यंदाच्या योग दिनाची थीम 'निरोगी वृद्धत्वासाठी योग' अशी ठेवण्यात आली आहे.

PM Modi International Yoga Day | Sarkarnama

आरोग्य

या थीमद्वारे वाढत्या वयातही शारीरिक आरोग्य, मानसिक शांतता आणि उत्तम जीवनशैली कशी राखता येईल, यावर भर देण्यात आला आहे.

PM Modi International Yoga Day

पंतप्रधान

तर पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आज कोलकाता येथील रेड रोडवर ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

PM Modi International Yoga Day

कोलकाता

पंतप्रधान मोदी यांनी कोलकाता येथील रेड रोडवर जमलेल्या हजारो योगसाधकांना संबोधित केलं.

PM Modi International Yoga Day | Sarkarnama

योग

यावेळी मोदी म्हणाले, "योग हा केवळ शारीरिक व्यायाम नसून तो कोणत्याही एका वयोगटापुरता मर्यादित नाही तर ती मानवी आत्म्याची अभिव्यक्ती आहे."

PM Modi International Yoga Day

आयुष्य

योग आपल्याला संतुलित आयुष्य जगायला शिकवतो आणि काय करावे व काय करू नये याचे भान देतो, असंही मोदी म्हणाले.

PM Modi International Yoga Day | Sarkarnama

लवचिक

तर आपण वयाच्या 40 व्या वर्षी, 20 व्या वर्षापेक्षा जास्त लवचिक असले पाहिजे.

PM Modi International Yoga Day

ध्येय

आणि 60 व्या वर्षी, 30 व्या वर्षापेक्षा जास्त ऊर्जावान राहिले पाहिजे, हे आपले ध्येय असायला हवं असंही मोदी म्हणाले.

PM Modi International Yoga Day | Sarkarnama

आवाहन

यावेळी मोदींनी योगाला केवळ एका दिवसापुरते मर्यादित न ठेवता तो दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचे आवाहन केलं.

PM Modi International Yoga Day

'योग 365'

याच उद्देशाने सरकारने यावर्षी 'योग 365' ही संकल्पना आणली असून, त्याअंतर्गत 100 दिवसांचे ऑनलाईन योग वर्गही सुरू केल्याचं त्यांनी सांगितलं.

PM Modi International Yoga Day | Sarkarnama

NEXT : राज ठाकरेंचा फोडाफोडीच्या राजकारणावर हल्ला, भाषणातील 10 महत्वाचे मुद्दे

Raj Thackeray | Sarkarnama
क्लिक