Ganesh Sonawane
मुंबईतील वांद्रे येथे आयोजित मनसेच्या विशेष मेळाव्यात राज ठाकरेंनी राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणावर शाब्दिक हल्ला केला.
1. ठाकरे गटाचे खासदार भाजपऐवजी शिंदेंच्या शिवसेनेत का गेले? यावर बोलताना, अमित शहा हे आत्तापासूनच 2029 ची स्वतःसाठी तयारी करत आहेत, असा दावा राज ठाकरेंनी केला.
2. खासदार आमदार जसे पळवले जात आहेत, तसे लहान मुलं व मुली पळवल्या जात आहेत. त्याचे व्यापार होत आहेत, त्यांना परदेशी पाठवलं जात आहे. काही मुलींना तर वेश्याव्यवसायासाठी पाठवलं जात आहे.
3. शेतकरी, विद्यार्थी आत्महत्या करत आहेत. नीटचे पेपर फुटत आहे. एवढे सगळे प्रश्न आज देशासमोर उभे असताना आमच्याकडे काय चालू आहे, आमची सत्ता टिकावी म्हणून आम्ही करोडो रुपये टाकायला तयार आहोत.
4. तुम्ही कोण आहात कोणी नाही. रांगेत उभे राहा. मेंढरासारखे मतदान करा आणि मोकळे व्हा. आज भाजपकडून सुरु आहे, उद्या दुसऱ्या पक्षाकडून सुरु होईल.
5. या पळवा-पळवीच्या राजकारणात आपण मुलभूत गोष्टी विसरत आहोत. महाराष्ट्राचे अस्तित्व, स्वाभिमान विसरत आहोत.
6. आम्हाला खासदार फोडायचे आहेत, आमदार फोडायचे आहेत, नगरसेवक फोडायचे आहेत. तुमच्या मताला किंमत काय? शुन्य…
7. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर टोला लगावताना म्हणाले की, हे सगळं ऐकलं तेव्हा वाटलं, बरं झालं आपला खासदार निवडून नाही आले.
8. 'स्वाभिमान गेला की उरतात फक्त जिवंत प्रेत!'
9. आता ज्या प्रकारचं राजकारण महाराष्ट्रात व देशामध्ये सुरू आहे. भविष्यात येणाऱ्या पिढ्यांना आपण काय सांगणार आहोत? आम्ही विकले गेलो, म्हणून तुमच्यासमोर ही परिस्थिती आली.
10. चहूबाजूंनी आम्ही काय बघतोय, आज सगळी लोक विकली जात आहेत.