सरकारनामा ब्यूरो
तुम्हाला जर पैशाची गुंतवणूक करायची आहे, तर ही पोस्ट ऑफिसची योजना आहे. ज्यामध्ये महिन्याला थोडेसे पैसे गुंतवल्यास तुम्हाला मिळणार आहेत लाखो रुपये. वाचा कसे ते...
सध्या शेअर बाजारात सतत उतार-चढाव होत आहे. त्यामुळे गुंतवणूक दाराला पैसे कोठे गुंतवायचा असा प्रश्न पडतो.
अशा परिस्थितीत गुंतवणूकदाराला कोणतीही जोखीम न घेता सुरक्षित आणि खात्रीने पैसे हवे असतील, तर पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट (TD) हा उत्तम पर्याय ठरू शकतो.
टाइम डिपॉझिट (TD) ही एक सरकारी योजना असून मुदत ठेवी Fixed Deposit प्रमाणे काम करत असते. आणि यातून गुंतवणूकदाराला आकर्षित व्याजदार परताव्याच्या स्वरुपात दिले जाते.
पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेवीत गुंतवणूकदारांने पाच वर्षासाठी दहा लाखांची गुंतवणूक केल्यास त्याला 7.5 टक्के इतका व्याजदर मिळणार आहे. म्हणजेच यातून मिळणाऱ्या व्याजाची रक्कम ही 14,49,949 रुपये असेल.
गुंतवणूकदाराच्या रक्कमेत दर तिमाहीला व्याज वाढवले जाते, यामुळे त्याला यातून जास्त परतावा मिळतो.
गुंतवणूकदार यामध्ये 1000 रुपयांपासून गुंतवणूक करु शकतो. यामध्ये जास्त रक्कम भरायची अशी कोणतीही मर्यादा नाही. तसेच सरकारचे याला पाठबळ असल्याने भांडवल गमावण्याची भीती नसणारे.
दीर्घकाळ गुंतवणूक करून चांगला परतावा मिळणार आहे. शेअर बाजारातील अस्थिरतेपासून बचाव होईल.