Aakash Kulhari : कमी गुण मिळाले म्हणून शाळेतून काढलं, जिद्दीला पेटलेल्या पोराने थेट IPS बनून स्वत:ला सिद्ध करून दाखवलं

Jagdish Patil

आकाश कुलहरी

'कोशिश करने वालों की हार नहीं होती', असं म्हटलं जातं. या वाक्याला साजेसं उदाहरण म्हणजे IPS आकाश कुलहरी आहेत.

Aakash Kulhari UPSC | Sarkarnama

कमी गुण

कारण कधीकाळी कमी गुण मिळाले म्हणून आकाश यांना शाळेतून काढलं होतं.

Aakash Kulhari UPSC | Sarkarnama

जिद्द

मात्र, जिद्दीच्या जोरावर त्यांनी पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक करत यशाला गवसणी घातली.

Aakash Kulhari UPSC | Sarkarnama

अतिरिक्त पोलिस आयुक्त

आकाश यांनी कानपूर आणि प्रयागराजमध्ये अतिरिक्त पोलिस आयुक्त म्हणून काम केलं आहे.

Aakash Kulhari UPSC | Sarkarnama

बिकानेर

राजस्थानातील बिकानेर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या आकाश यांची सक्सेस स्टोरी अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

Aakash Kulhari UPSC | Sarkarnama

शाळेतून काढलं

आकाश यांनी सांगितलं की, 1996 मध्ये दहावीच्या परीक्षेत केवळ 57% गुण मिळाल्यामुळे त्यांना शाळेतून काढण्यात आलं होतं.

Aakash Kulhari UPSC | Sarkarnama

बारावी

मला पुन्हा त्या शाळेत प्रवेश दिला नाही. पण मी हार मानली नाही आणि जिद्दीने अभ्यास करून स्वत:ला सिद्ध केलं, असं ते म्हणाले.

Aakash Kulhari UPSC | Sarkarnama

यश

त्यांना बारावीत 85% मिळाले, त्यानंतर डूग्गल कॉलेजमधून बी.कॉम तर JNU तून M.com केलं. याचवेळी त्यांनी UPSC ची तयारी सुरू केली आणि 2006 ला पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक केली.

Aakash Kulhari UPSC | Sarkarnama

NEXT : 'या' IPS अधिकाऱ्याची संपत्ती मुख्यमंत्र्यांना लाजवणारी; आकडा पाहून तुमचेही डोळे फिरतील!

IPS Awakash Kumar
क्लिक करा