Rashmi Mane
देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये बड्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरूच आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर राज्य सरकारने मुंबई पोलिसांमध्ये एक अतिरिक्त सहआयुक्त पदाची निर्मिती करण्याची घोषणा केली होती. याबद्दलचे राज्य सरकारनं याबाबतचे पत्रक जारी केले आहे.
महाराष्ट्र कॅडरच्या 2006 बॅचच्या आयपीएस अधिकारी आरती सिंह यांची शुक्रवारी मुंबई पोलिसांच्या पहिल्या सह पोलिस आयुक्त (गुप्तचर) म्हणून नियुक्ती करण्यात आली.
याआधी, सिंह राज्य सीआयडीमध्ये कार्यरत होत्या. मूळ उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथील रहिवासी असलेल्या सिंह यांनी बीएचयूमधून एमबीबीएस पदवी मिळवली आहे.
त्या सध्या विशेष महानिरीक्षक (विशेष आयजी) या पदावर कार्यरत आहेत. यासोबतच इतर 9 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
यामध्ये शशी कुमार मीणा यांची उत्तर विभागाचे अतिरिक्त सीपी अभिषेक त्रिमुखे यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे, तर शैलेश बलकवडे यांना अतिरिक्त सीपी (गुन्हे) आणि मध्य विभागाचे अतिरिक्त सीपी अनिल पारसकर यांना संरक्षण आणि सुरक्षा विभागात पाठवण्यात आले आहे.
देशविरोधी कारवायांवर लक्ष ठेवणे, दहशतवादविरोधी उपाययोजनांमध्ये समन्वय साधणे आणि मुंबईची एकूण सुरक्षा व्यवस्था मजबूत करणे यामध्ये सिंग यांची भूमिका महत्त्वाची असेल.
वरिष्ठ आयपीएस अधिकारी डॉ. आरती सिंह या देशातील पहिल्या महिला अधिकारी होत्या ज्या आयुक्तालयात पोलिस आयुक्त म्हणून नियुक्त झाल्या होत्या. कोरोना काळात त्या मालेगावमध्ये एसपी म्हणून तैनात होत्या.