सरकारनामा ब्यूरो
वाराणसी येथे राहणाऱ्या अदिती या लहानपणापासून अभ्यासात खूप हुशार होत्या. त्यामुळे शाळेत नेहमी त्या पहिल्या क्रमांकाने पास व्हायच्या. शाळेत असतानाचं त्यांनी डॉक्टर होण्याचं ठरवल होतं.
बनारस मधील हिंदू यूनिवर्सिटीतून Bachelor of Dental Surgery (BDS) करुन अदिती या डेंटिस्ट झाल्या.
अदिती उपाध्याय यांनी डेंटिस्टची प्रॅक्टिस करत असताना 'यूपीएससी'ची तयारी करण्याचं ठरवलं. त्यांनी UPSC परीक्षेसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर अभ्यास केला.
अदिती यांनी दिवसा डेंटिस्टची प्रॅक्टिस आणि रात्री UPSC परीक्षेची तयारी अशी मेहनत घेत अभ्यासाचं वेळापत्रक तयार केलं होत.
UPSC नागरी सेवा (मुख्य) परीक्षेत त्यांना 987 इतके गुण मिळाले. यानंतर त्यांनी प्रॅक्टिस सोडली आणि मुलाखतीची तयारी सुरु केली.
2023 मध्ये 'यूपीएससी' परीक्षा उत्तीर्ण करत त्यांनी 127 वा रँक मिळवला.
अदिती यांची निवड 'आयपीएस'(IPS) या पदासाठी करण्यात आली .