सरकारनामा ब्यूरो
असे अनेक विद्यार्थी असतात जे IAS आणि IPS अधिकारी होण्यासाठी त्यांच्या स्वखुशीने नोकरीचा त्याग करतात. यातीलच एक नाव म्हणजे अंजली विश्वकर्मा.
लाखो रुपयांचा पगार असलेली नोकरी सोडून देशाची सेवा करण्याची इच्छा अंजली विश्वकर्मा यांनी पूर्ण केली आहे.
2021 बॅचच्या IPS अधिकारी असलेल्या कानपूरच्या अंजली विश्वकर्मा यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण डेहराडूनमध्ये पूर्ण केले आहे.
लहानपणापासून डाॅक्टर बनण्याचं स्वप्न असलेल्या अंजली यांनी कालांतरांने IIT कानपूर येथून एरोस्पेस इंजिनिअरिंगमधून B.Tech ची पदवी प्राप्त केली.
पदवीनंतर नोकरीसाठी त्यांची निवड न्यूझीलंडमधील तेल कंपनीत झाली. यानिमिताने त्यांना अनेक देशांतर्गत फिरण्याची संधी मिळाली.
काम करत असताना त्यांना देशसेवा करण्याचं मनात आल्यानं त्यांनी लाखो रुपयांच्या नोकरीचा राजीनामा देत त्या भारतात आल्या आणि UPSC परीक्षेचा अभ्यास सुरू केला.
पहिल्या प्रयत्नात अपयश आल्यानं त्यांनी दुसऱ्यांदा परीक्षा दिली. या परीक्षेत यश प्राप्त करत त्यांची निवड भारतीय वनसेवेसाठी करण्यात आली होती. पण त्यांनी IPSची निवड करत झाशी जिल्ह्यात बारूसागर पोलीस ठाण्याचा कार्यभार सांभाळला.
सध्या त्या उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्याच्या सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) म्हणून कार्यरत आहेत.