Jagdish Patil
सरकारने सेबीच्या अध्यक्षपदी सध्याचे वित्त सचिव तुहिन कांत पांडे यांची नियुक्ती केली आहे.
विद्यमान अध्यक्षा माधवी पुरी बुच यांच्या जागी पांडेंची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असणार आहे.
सेबीच्या प्रमुखांना किती पगार मिळतो आणि त्यांचं प्रमुख काम काय असतं ते जाणून घेऊया.
SEBI चे अध्यक्ष हे भारतीय शेअर मार्केटचे सर्वोच्च नियामक असतात. ते गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण आणि बाजारातील पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी काम करतात.
SEBI च्या प्रमुखांना भारत सरकारच्या सचिवांच्या इतकाच पगार मिळतो. जो दर महिना 5,62,500 इतका असतो.
पगाराशिवाय अध्यक्षांना सरकारी नियमांनुसार इतर भत्ते आणि सुविधा मिळतात. त्यामध्ये प्रवास भत्ता, वैद्यकीय सुविधा आणि अधिकृत निवासस्थानाचा समावेश आहे.
SEBI अध्यक्षांचा कार्यकाळ 5 वर्षांसाठी किंवा वयाच्या 65 वर्षांपर्यंत असतो. नियुक्ती प्रक्रिया आर्थिक क्षेत्र नियामक नियुक्ती शोध समिती (FSRASC) च्या शिफारशीवर आधारित असते.
सध्याच्या SEBI अध्यक्षा माधबी पुरी बुच यांचा कार्यकाळ 28 फेब्रुवारी 2025 रोजी संपत आहे. 2 मार्च 2022 रोजी त्यांची या पदावर नियुक्ती झाली होती.