निळी साडी अन् हातात AK-47! IPS अंकिता शर्मांचा हा 'दबंग' अंदाज पाहिलाय का? फोटो तुफान व्हायरल

Rashmi Mane

निळी साडी अन् हातात AK-47!

IPS अंकिता शर्मा यांचा ‘दबंग’ अंदाज सध्या चर्चेत आहे. छत्तीसगडमधील शस्त्रपूजन सोहळ्यातील त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विजयादशमीचा खास सोहळा

छत्तीसगडमधील राजनांदगाव पोलीस लाइनमध्ये विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

हातात आधुनिक रायफल

शस्त्रपूजनानंतर अंकिता शर्मा AK-47 मधून हवेत गोळीबार करताना दिसल्या. त्यांच्या या कृतीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले.

साडीतील ‘दबंग’ अंदाज

सहसा पोलीस अधिकाऱ्यांना गणवेशात पाहायला मिळते. मात्र, अंकिता शर्मा निळ्या साडीत हातात रायफल घेऊन दिसल्याने त्यांचा हा लूक चर्चेत आला.

शस्त्रांची विधिवत पूजा

कार्यक्रमात पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि जवान सहभागी झाले होते. यावेळी पारंपरिक पद्धतीने शस्त्रांची पूजा करण्यात आली.

पोलीस वाहनांचेही पूजन

शस्त्रपूजनासोबतच पोलीस वाहनांचीही पूजा करण्यात आली. विजयादशमीच्या निमित्ताने पोलीस दलात हा सोहळा पार पडला.

परंपरा अन् आधुनिकतेचा संगम

पारंपरिक भारतीय पोशाख आणि हातातील आधुनिक शस्त्र यामुळे अंकिता शर्मा यांचे छायाचित्र वेगळे ठरले. उपस्थितांनी हा क्षण कॅमेऱ्यात टिपला.

व्हिडिओची सर्वत्र चर्चा

राजनांदगावमधील या सोहळ्यातील अंकिता शर्मा यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे. त्यांच्या निळ्या साडीतील अंदाजाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

Next : अभिनेता टायगर श्रॉफवरील फायरिंगनंतर मुंबई पोलिसांनी तत्काळ फिरवला फोन...कोण आहेत आयपीएस तेजस्विनी गौतम ..?

येथे क्लिक करा