16 बळी अन् तडकाफडकी राजीनामा! कोण आहेत चर्चेत आलेले IPS अनुराग सुजानिया?

Aslam Shanedivan

विषारी दारू प्रकरण

मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील बांदा येथे विषारी दारू प्यायल्याने १६ जणांचा मृत्यू झाल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित झाले होते.

IPS Anurag Sujania Resigns | Sarkarnama

अनुराग सुजानिया

या प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाल्यानंतर पोलीस अधीक्षक आयपीएस अनुराग सुजानिया यांना पदावरून हटवण्यात आले होते.

IPS Anurag Sujania Resigns | Sarkarnama

अनुराग यांचा राजीनामा

तर त्यांची नियुक्ती पोलीस मुख्यालयात एआयजी म्हणून करण्यात आली होती. मात्र चारच दिवसांनंतर त्यांनी भारतीय पोलीस सेवेचा राजीनामा दिला आहे.

IPS Anurag Sujania Resigns | Sarkarnama

कारण काय?

आयपीएस अधिकारी अनुराग सुजानिया यांनी वैयक्तिक कारणांमुळे आपण राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे.

IPS Anurag Sujania Resigns | Sarkarnama

पोलीस वर्तुळात खळबळ

पण वरिष्ठ पदावरून हटवल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा असून आता पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

IPS Anurag Sujania Resigns | Sarkarnama

२०१४ च्या बॅचचे IPS

अनुराग सुजानिया हे २०१४ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून ते मध्य प्रदेश कॅडरमध्ये कार्यरत आहेत. ते मूळचे राजस्थानचे असून एमटेकपर्यंत शिक्षण घेतले आहे.

IPS Anurag Sujania Resigns | Sarkarnama

पोलीस अधीक्षक

अनुराग सुजानिया यांनी टीकमगढ, मंदसौर आणि मुरैना यांसारख्या जिल्ह्यांमध्ये पोलीस अधीक्षक म्हणून काम केल्यानंतर त्यांची सागर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाली होती.

IPS Anurag Sujania Resigns | Sarkarnama

महिला शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! नावावर शेतजमीन नसेल तरी मिळणार 'हे' सरकारी लाभ

आणखी पाहा