थेट मुख्यमंत्र्यांना भिडणारी 'वाघीण', महिला IPS अधिकारी पुन्हा मैदानात; जुनी प्रकरणं उकरून काढणार...

Rajanand More

IPS दमयंती सेन

पश्चिम बंगालमधील १९९६ च्या तुकडीतील वरिष्ठ आयपीएस अधिकारी दमयंती सेन पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. नवीन सरकारने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविली आहे.

IPS Damayanti Sen | Sarkarnama

बंगाल सरकार

बंगाल सरकारने मागील सरकारच्या काळात महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांची चौकशी करण्यासाठी आयोग नेमला आहे. आयपीएस सेन या आयोगाच्या सदस्य सचिव असतील.

Suvendu Adhikari | Sarkarnama

थेट मुख्यमंत्र्यांना भिडल्या

आयपीएस सेन यांनी २०१२ मध्ये थेट तत्कालीन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे आदेश डावलत एका बलात्कार प्रकरणाचा तपास तडीस नेला होता. त्या सध्या अतिरिक्त पोलीस महासंचालक (ट्रेनिंग) या पदावर आहेत.

IPS Damayanti Sen | Sarkarnama

आरोपी अटक

कोलकातामधील हे बलात्कार प्रकरण बनावट असल्याचे सांगत सरकारने फाईल बंद करण्याचे आदेश दिले होते. पण सेन यांनी तपास सुरूच ठेवत आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या.

IPS Damayanti Sen | sarkarnama

लगेच बदली

या प्रकरणानतर सेन यांची काही दिवसांत प्रशिक्षण महाविद्यालयात बदली करण्यात आली होती. त्यांना कमी महत्वाच्या पदावर पोस्टिंग दिली होती.

IPS Damayanti Sen | Sarkarnama

आंदोलन

IPS सेन यांच्या बदलीविरोधात कोलकातामध्ये नागरिकांनी आंदोलन केले होते. या घटनेपासून सेन यांना कोलकातामध्ये पोस्टिंग दिली गेली नव्हती.

IPS Damayanti Sen | Sarkarnama

वाघीण

२०१२ मधील बलात्कार प्रकरणातील पीडितेने सेन यांचा उल्लेख 'वाघीण' असा केला होता.एक धडाकेबाज, प्रामाणिक आयपीएस अधिकारी म्हणून त्यांची ओळख बनली.

IPS Damayanti Sen | Sarkarnama

मुख्यमंत्र्यांचा मास्टरस्ट्रोक

मुख्यमंत्री अधिकारी यांनी सेन यांनाच महिलांवरील अत्याचार प्रकरणाशी संबंधित आयोगात घेत ममता बॅनर्जी यांना धक्का दिल्याचे मानले जात आहे.

IPS Damayanti Sen | Sarkarnama

NEXT : वाहनात पेट्रोल-डिझेल भरताना कशी होते फसवणूक? 'या' महत्वाच्या गोष्टींकडे ठेवा लक्ष...

येथे क्लिक करा.