Rajanand More
इराण, युक्रेन युध्दामुळे जगभरातील अनेक देशांना इंधन टंचाईचा सामना करावा लागत आहे. तर भारतासह अनेक देशांमध्ये इंधनाचे दरही वाढले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन जपून वापरण्याचे आवाहन केले.
पेट्रोल किंवा डिझेल वाहनांत भरताना काहीवेळा ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यासाठी वेगवेगळ्या ट्रिक वापरल्या जातात. ही फसवणूक टाळण्यासाठी काय करायचे, हे आपण पाहूयात.
पेट्रोल पंपाच्या मशीनमध्ये चिप बसवली जाते. रिमोटद्वारे ही चिप नियंत्रित करून कमी प्रमाणात पेट्रोल सोडले जाते. मीटर रीडिंग व्यवस्थित दिसत असले तरी प्रत्यक्षात इंधन कमी भरले जाते.
पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांकडून पुर्वीचे इंधन भरल्याचे मशीन शुन्यावर न आणता पुढील वाहनांत तसेच इंधन भरले जाते. आधीचे रीडिंग पुढच्या ग्राहकाच्या बिलात जोडले जाते.
काहीवेळी मीटर रीडिंगमध्ये आकडे वेगाने पुढे जातात. यामध्ये तुम्हाला रीडिंग वाढत असताना दिसत असले तरी इंधन कमी जाते.
फसवणूक टाळण्यासाठी वाहनात इंधन भरण्याआधी मशीनवरील झिरो तपासा. जेणेकडून आधीच्या वाहनाचे रीडिंग पुढे सुरू राहणार नाही.
वाहनात इंधन भरणे सुरू झाल्यानंतर ते पूर्ण होऊपर्यंत रीडिंगकडे लक्ष राहू द्या. रीडिंग खूप वेगाने पुढे जात असेल तर त्याबाबत तक्रार करा.
काहीवेळा कर्मचारी वाहनचालकांना बोलण्यात गुंतवून रीडिंग शुन्यावर न आणता थेट पूर्वीच्या रीडिंगनुसार पुढे इंधन भरण्यास सुरूवात करतात. त्यामुळे सतर्क राहा.
वाहन इंधन कमी भरले जात असल्याची शंका आल्यास मोजमाप करा. तुम्हाला पेट्रोल पंप चालकाडून तशी तेथील उपलब्ध साधनातून मोजमाप करून मागण्याचा अधिकार आहे. त्यानंतर शंका दूर न झाल्यास कंपनीकडे तक्रार करा.