सरकारनामा ब्यूरो
बिहारचे माजी DGP (Director General of Police) गुप्तेश्वर पांडे यांचा जन्म बिहारमधील बक्सरच्या गेरुआबंद गावात झाला.
गावात वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य या मूलभूत सुविधाही उपलब्ध नव्हत्या. अशा गावात त्यांनी उच्च शिक्षण घेण्याची इच्छा बाळगली.
अशा वातावरणातही कठोर मेहनत घेत अभ्यास केला आणि त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले.
बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पाटणा विद्यापीठातून त्यांनी पदवी प्राप्त करताच यूपीएससीची परीक्षा दिली.
पहिल्या प्रयत्नात आयआरएस म्हणून त्यांची निवड झाली. पुन्हा परीक्षा दिली आणि आयपीएस झाल्यानंतर त्यांना बिहार केडर देण्यात आले.
बिहारमधील अनेक महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये एसपी (Superintendent of Police) म्हणून काम केल्यानंतर ते आयजी (Inspector General) राहिले.
बिहारचे डीजीपी बनवण्यात आल्यानंतर सेवा संपण्याच्या 6 महिने आधीच व्हीआरएस (Voluntary Retirement Scheme) घेत त्यांनी राजकारणात प्रवेश केला.
कालांतराने राजकारणातूनही निवृत्त झाले आणि आता भगवंताच्या भक्तीत मग्न होत लोकांना श्रीमद् भागवत कथा सांगण्यास त्यांनी सुरुवात केली आहे.
R