सरकारनामा ब्यूरो
राजस्थान केडरच्या धडाकेबाज आयपीएस अधिकारी ज्येष्ठा मैत्रेयी सध्या चर्चेत आल्या आहेत.
भिवडीची पोलिस अधिकारी ज्येष्ठा मैत्रेयींचे लोकेशन त्यांच्याच विभागातील काही अधिकारी बेकायदेशीरपणे ट्रॅक करत असल्याचे समोर आले.
यामध्ये 15हून अधिक वेळा मोबाईलचं लोकेशन ट्रॅक करत ज्येष्ठा यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवल्याचं आढळून आलं आहे.
या बेकायदेशीर कारवाईमध्ये पोलिस स्टेशनमधील पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
ज्येष्ठा मैत्रेयी या मूळच्या मध्य प्रदेशामधील गुना जिल्ह्यातील आहेत. त्यांचे वडील गिरीशचंद्र आर्य हे एमपी इलेक्ट्रिसिटी बोर्डात काम करतात. तर आई सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षिका आहेत.
ज्येष्ठा यांना लहानपणापासूनच IAS बनायचे होते. त्यांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. 2018 मध्ये त्यांनी UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि त्या आयएएस अधिकारी झाल्या.
ज्येष्ठा यांनाा यूपीएससी परीक्षेत 156 वा रँक मिळाला आणि त्यांना राजस्थान केडर मिळाले.
अंडर-ट्रेनिंग आयपीएस अधिकारी म्हणून ज्येष्ठा यांची पहिली पोस्टिंग उदयपूर जिल्ह्यातील गिरवा सर्कलमध्ये झाली होती.