सरकारनामा ब्यूरो
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 99 उमेदवारांची घोषणा केली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांनाही भाजपनं भोकर येथून तिकीट दिलं आहे.
2014 मध्ये भोकरमधून अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण या विधानसभेत गेल्या होत्या. तर, अशोक चव्हाण यांनी 2019 मध्ये येथून निवडणूक जिंकली होती.
आता अशोक चव्हाण यांचा वारसा चालवण्यासाठी श्रीजया यांनीही राजकारणात प्रवेश केला आहे.
श्रीजया या वकील आहेत. त्या भोकर विधानसभा क्षेत्राच्या प्रमुख म्हणून काम करत होत्या. .
श्रीजया नांदेडमधील शारदा भवन एज्युकेशन सोसायटीच्या सदस्य आहेत. त्यासह महिला सक्षमीकरण, शिक्षण सामाजिक समस्या सोडविण्याकरीता त्या नेहमी पुढे असतात.
सामाजिक, राजकीय क्षेत्रात श्रीजया चांगली सुरूवात करेल. मला मतदारसंघानं साथ दिली. श्रीजयही निवडून येईल, असा विश्वास अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.