Rashmi Mane
यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करणे तसे कठीणच पण काही लोक असे आहेत जे मेहनतीच्या जोरावर यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रत्येकासाठी प्रेरणा बनतात.
असेच एक नाव आहे कुहू गर्ग, ज्या एक चांगल्या ऍथलीट आहे, ज्याने 2023 मध्ये UPSC 178 मार्कसह उत्तीर्ण केली.
उत्तराखंडचे निवृत्त डीजीपी, वडील अशोक कुमार यांच्या पावलावर पाऊल ठेवत गर्गने यूपीएससी परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला.
जाणून घेऊया त्यांच्या प्रेरणादायी करिअर बद्दल..
कुहू गर्ग या बॅडमिंटनपटू असून त्या मूळच्या डेहराडून, उत्तराखंडच्या आहेत.
त्यांचे वडील अशोक कुमार हे 1989 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांच्याकडूनच कुहू यांना अधिकारी होण्याची प्रेरणा मिळाली.
कुहू गर्गने आपले सुरुवातीचे शिक्षण सेंट थॉमस कॉलेज, डेहराडून येथे केले. दिल्लीच्या एसआरसीसी कॉलेजमधून पदवी प्राप्त केली.
कुहू गर्गने वयाच्या 9 व्या वर्षी बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली. आतापर्यंत त्यांनी बॅडमिंटनमध्ये 56 राष्ट्रीय (ऑल इंडिया रँकिंग) आणि 19 आंतरराष्ट्रीय पदके जिंकली आहेत.