IPS अधिकाऱ्याची थेट खासदारालाच मानहानीची नोटीस; 5 कोटींचा दावा ठोकणार

Rajanand More

IPS कुंदन कृष्णन

आयपीएस अधिकारी कुंदन कृष्णन हे बिहारचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) म्हणून कार्यरत आहेत. ते १९९४ च्या तुकडीचे वरिष्ठ अधिकारी असून पोलीस दलात दबदबा आहे.

IPS Kundan Krishnan | Sarkarnama

मानहानीची नोटीस

आयपीएस कृष्णन यांनी राष्ट्रीय जनता दलाचे खासदार सुधाकर सिंह यांना मानहानीची कायदेशीर नोटीस पाठवली आहे. १५ दिवसांत माफी न मागितल्यास ५ कोटीची नुकसान भरपाई आणि फौजदारी मानहानीचा खटला दाखल करू, असे नोटिशीमध्ये म्हटले आहे.

MP Sudhakar Singh | Sarkarnama

नेमकं कारण काय?

हे प्रकरण भरत भूषण तिवारी या तरुणाचा एन्काऊंटर आणि आणि जमुई येथील मुलीच्या विनयभंगाच्या घटनेसंदर्भात खासदारांनी केलेल्या वक्तव्यांशी संबंधित आहे.

MP Sudhakar Singh | Sarkarnama

भूमिकेवर प्रश्नचिन्ह

सुधारकर सिंह यांनी तिवारीचा मृत्यू आणि जमुईतील घटनेच्या अनुषंगाने कुंदन कृष्णन यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. सिंह यांनी काही गंभीर आरोप केले होते.

IPS Kundan Krishnan | Sarkarnama

आरोप फेटाळले

कुंदन कृष्णन यांनी सर्व आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. बिहार सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी २० जून २०२६ रोजी निवृत्त न्यायमूर्ती विनोद कुमार सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी आयोग स्थापन केला आहे.

IPS Kundan Krishnan | Sarkarnama

माफी मागणार नाही

कायदेशीर नोटिशीला कायद्यानेच उत्तर दिले जाईल, असे सिंह यांनी म्हटले आहे. आपण माफी मागणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे हे प्रकरणात कोर्टात जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

MP Sudhakar Singh | Sarkarnama

चौकशीची मागणी

तिवारीचा मृत्यू झाला त्यावेळी कुंदन कृष्णन हे एसटीएफचे महासंचालक होते. त्यामुळे, पोलीस कमांड, पोलीस मुख्यालय आणि वरिष्ठ निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी सिंह यांनी केली आहे.

IPS Kundan Krishnan | Sarkarnama

राष्ट्रपती पदक

आयपीएस कुंदन कृष्णन यांना राष्ट्रपतींचे विशिष्ट सेवेसाठीचे पोलीस पदक, शौर्य पदक मिळाले आहे. तसेच केंद्रीय निवडणूक आयोगानेही त्यांना राष्ट्रीय मतदार दिन विशेष पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

IPS Kundan Krishnan | Sarkarnama

NEXT : औकातीत राहून बोलायचं! बड्या नेत्यानं सुनावलं, काँग्रेसच्या 'या' नगरसेविकेमुळे पक्ष फुटणार?

येथे क्लिक करा.