Deepak Kulkarni
इंटेलिजन्स ब्युरोचे प्रमुखपदी नियुक्ती झालेले महेश दीक्षित हे एक भारतीय प्रशासकीय सेवेतील आयपीएस अधिकारी आहेत.
दीक्षित हे 1993 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. दीक्षित हे तेलंगणा केडरचे अधिकारी आहेत. त्यांचा आपल्या कारकिर्दीचा बहुतांश काळ आयबीमध्ये घालवला आहे.
दीक्षित हे सध्या गुप्तचर यंत्रणांचे विशेष संचालक म्हणून कार्यरत होते. ते देशातील सर्वात अनुभवी गुप्तचर अधिकाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात.
ते आता आयबीच्या प्रमुखपदासह या गुप्तचर संस्थेतील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च अधिकारी बनले आहेत.
त्यांची नियुक्ती ही विद्यमान आयबी प्रमुख तपन डेका यांच्या जागेवर होणार आहे. डेका यांचा कार्यकाळ 30 जून रोजी संपणार आहे.
मोदी सरकारकडून जगाला धडकी भरवणाऱ्या 'आयबी'चे प्रमुख म्हणून डॉ. महेश दीक्षित नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ हा दोन वर्षांसाठी असणार असून ते पुढील आदेश येईपर्यंत या पदावर कार्यरत राहतील.
पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (एसीसी) आयपीएस अधिकारी महेश दीक्षित यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे.
1 जुलै 2026 रोजी इंटेलिजन्स ब्युरोचे संचालक म्हणून पदभार स्वीकारणारे महेश दीक्षित हे कदाचित पहिले डॉक्टर आहेत.
ईशान्य आणि लडाखमधील कारवायांपासून ते नक्षलविरोधी पथकांपर्यंत विविध प्रकारच्या संवेदनशील जबाबदाऱ्या त्यांनी हाताळल्या आहेत.