सरकारनामा ब्यूरो
धडाकेबाज पोलिस अधिकारी नय्यर हसनैन खान हे बिहारमध्ये परत येणार आहेत. त्यांना बिहार पोलिस मुख्यालयात नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.
बिहार पोलिसांच्या इतिहासातील धडाकेबाज अधिकारी म्हणून नय्यर हसनैन खान यांच्याकडे पाहिले जाते.
त्यांच्या पुनरागमनामुळे बिहार राज्यातील पोलिस प्रशासनाला आणखी बळ मिळेल, प्रशासनात आणखी सुधारणा होतील असं म्हटलं जात आहे.
नय्यर हसनैन खान हे 1996 बॅचचे IPS अधिकारी आहेत. धडाकेबाज कामगिरीसाठी ते ओळखले जातात.
ते 8 महिन्यापूर्वी केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेले होते. त्यांना सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक म्हणून जबाबदारी मिळाली होती.
पण आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहार सरकारने केंद्रीय गृह मंत्रालयाला त्यांना परत राज्यात पाठविण्याची मागणी केली होती, जी मंजूर करण्यात आली आहे.
खान यांनी यापूर्वी आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक महासंचालक म्हणून कारकीर्द गाजवली आहे. त्यांनी त्यांच्या कारकीर्दीत अनेक पेपरफुटीची प्रकरणे उघड केली आहेत.