Modi at Gurudwara : नरेंद्र मोदी अन् न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन गुरुद्वारा रकाबगंज साहिब येथे नतमस्तक

Mayur Ratnaparkhe

गुरुद्वारा रकाबगंज साहिब -

पंतप्रधान नरेंद्र मोदी न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सनसह गुरुद्वारा रकाबगंज साहिब येथे पोहोचले होते.

मनोभावे प्रार्थना -

या दोन्ही नेत्यांनी गुरुद्वारामध्ये माथा टेकवत मनोभावे प्रार्थना केली.

गुडघ्यावर बसून प्रार्थना -

न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन हे देखील गुडघ्यावर बसून हात जोडताना दिसले.

गुरुद्वारा समितीकडून सन्मान -

गुरुद्वारा समितीने न्यूझीलंडचे पंतप्रधान लक्सन आणि पंतप्रधान मोदी यांचा सन्मान केला.

पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर -

न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन रविवारी पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत.

पहिलाच दौरा -

पदभार स्वीकारल्यानंतर हा लक्सन यांचा हा पहिलाच अधिकृत दौरा आहे.

आर्थिक भागीदारी -

त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आर्थिक भागीदारीसारख्या मुद्द्यांवर चर्चा केली.

प्रसन्न चेहरा -

मोदी आणि लक्सन यांच्या चेहऱ्यावर गुरुद्वारात पोहचल्यावर अतिशय प्रसन्नता दिसत होती.

Next : महाराणा प्रताप यांच्या वंशजाजे निधन, कसा होता अरविंद सिंग मेवाड यांचा जीवन प्रवास

Arvind Singh Mewar | sarkarnama
येथे पाहा