सरकारनामा ब्यूरो
काहीच विद्यार्थी असतात जे UPSC सारखी कठीण परीक्षा उत्तीर्ण होऊन विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्त्रोत बनतात. त्यातील एक प्रेरणादायी स्टोरी आहे नीपा मनोचा यांची.
नीपा यांनी CSची परीक्षा देत संपूर्ण भारतातून 8वा रँक मिळवला होता.
CS (Company Secretary) च्या रँक नुसार त्यांना स्टॅाक एक्सचेंज कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळाली होती. मात्र त्यांनी ती नोकरी सोडून दिली.
नीपा यांनी दिल्लीतील प्रसिद्ध लेडी श्रीराम या कॅालेजमधून त्यांच ग्रॅज्यूएशन पूर्ण केलं.
2017 मध्ये त्यांनी दिल्ली स्कूल ऑफ इकोनोमिक्स येथून 'अर्थशास्त्र' या विषयात मास्टरची डिग्री घेतली.
UPSC ची परीक्षा देण्याच ठरवत. UPSC परीक्षेची तयारी करण्यास सुरुवात केली.
त्यांनी UPSC ची तब्बल तीनदा परीक्षा दिली, पण त्यांना तीनही वेळा अपयश आले. तरीही त्यांनी हार न मानता त्यांच्या अभ्यासक्रमातील चुका सुधारल्या आणि UPSCची चौथ्यांदा परीक्षा दिली.
2022 ला त्यांना या परीक्षेचं यश मिळालं. संपूर्ण भारतातून 144वी रँक मिळवत त्यांची नेमणूक IPS अधिकारी म्हणून करण्यात आली.