Rajanand More
मध्य प्रदेशातील उमरिया जिल्ह्याच्या पोलिस अधिक्षक निवेदिता नायडू यांच्या सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
आठ महिन्यांच्या गर्भवती असून अनेकदा रात्रभर गस्त घालताना दिसतात. याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल.
कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख. रात्रीच्यावेळी नागरिकांशी चर्चा करणे, अडचणीमध्ये मदत करणे यामुळे स्थानिकांमध्ये चर्चेतील चेहरा.
निवेदिता नायडू या 2016 च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी आहे. त्यांचे वडील आयएएस अधिकारी होते.
ज्योती किरण या भगिनी असून 2015 मध्ये एकाचवेळी यूपीएससी परिक्षा उत्तीर्ण झाल्या. त्यामुळे नायडू कुटुंबाची मध्य प्रदेशात चर्चा होती.
दोघी बहिणींनी भोपाळमधील लॉ इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटीतून विधी शाखेची पदवी मिळवली आहे.
निवेदता नायडू यांचे पती दुसऱ्या जिल्ह्यामध्ये पोलिस अधिक्षक आहेत. घरी तीन वर्षांची मुलगी सोडून त्या ड्यूटीसाठी मध्यरात्रीही घराबाहेर पडतात.
गर्भवती महिलांना मॅटर्निटी लिव्ह मिळते. मात्र त्या हक्काची सुटी न घेता जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी झटत आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या काळातही त्यांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक झाले. आता लोकसभा निवडणुकीतही त्यांनी आपल्या कामाने सर्वांची मने जिंकली आहेत.