IPS Noorul Hasan: 'शास्त्रज्ञ' म्हणून काम करत असतानाच 'यूपीएससी'ची तयारी...!

Rashmi Mane

नुरुल हसन

यूपीच्या पिलीभीत जिल्ह्यातील एका छोट्या गावात जन्मलेल्या नुरुल हसन यांनी लहानपणी भविष्यात आयपीएस अधिकारी होणार असा विचारही केला नसेल.

IPS Noorul Hasan | Sarkarnama

संघर्षमय आयुष्य

अत्यंत गरीब कुटुंबातून आलेल्या नूरुल यांनी आपल्या आयुष्यात खूप संघर्ष पाहिला. पण असं म्हणतात की, आयुष्यात काहीतरी करण्याची जिद्द असेल तर माणूस प्रत्येक अशक्य गोष्ट शक्य करू शकतो.

IPS Noorul Hasan | sarkarnama

संघर्षाची सुरुवात

पिलीभीत जिल्ह्यातील हरराईपूर गावात राहणाऱ्या नुरुल हसन यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुरुवातीपासूनच बिकट होती.

IPS Noorul Hasan | Sarkarnama

कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेही कठीण

वडिलांना लहानपणी नोकरीही नव्हती. मात्र, नंतर त्यांना चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याची नोकरी मिळाली. आई गृहिणी होती आणि नुरुल यांना दोन लहान भाऊही होते. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले होते.

IPS Noorul Hasan | Sarkarnama

सहावीत शिकले इंग्रजी

नुरूल यांचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले. इयत्ता सहावीत असताना ते इंग्रजी शिकले त्यामुळेच त्यांचे इंग्रजी सुरुवातीला फारच कमकुवत होते.

IPS Noorul Hasan | Sarkarnama

संकटकाळातही शाळा अव्वल ठरली

लहानपणी गरिबीत बालपण घालवल्यानंतरही नुरुल हसन यांनी जिद्दीने अभ्यासकरुन दहावीत ६७ टक्के गुण मिळवून शाळेत अव्वल स्थान पटकावले होते.

IPS Noorul Hasan | Sarkarnama

संघर्षावर मात करत

नुरुल यांच्या मनात नेहमीच पुढे जाण्याची इच्छा होती, यामुळेच जीवनातील संघर्षांकडे दुर्लक्ष करून ते पुढे जात राहिले.

IPS Noorul Hasan | Sarkarnama

शास्त्रज्ञ

1995 मध्ये त्यांनी भाभा अणुसंशोधन संस्थेची परीक्षा दिली आणि तारापूर केंद्रात शास्त्रज्ञ या पदासाठी त्यांची निवड झाली.

IPS Noorul Hasan | Sarkarnama

तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससी उत्तीर्ण

नुरुल यांनी शास्त्रज्ञ म्हणून काम करत असतानाच यूपीएसीसाठी प्रयत्न सुरू केले. पहिल्या दोन प्रयत्नात अपयश मिळाल्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली.

IPS Noorul Hasan | Sarkarnama

Next : किती वेळा देऊ शकता UPSC परीक्षा, कोणती पात्रता आहे 

येथे क्लिक करा