Rashmi Mane
UPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी बनण्याचे अनेकांचे स्वप्न असते. भारतात यूपीएससी परीक्षेची प्रचंड क्रेझ आहे.
या परीक्षेमुळे लोकांचे आयएएस, आयपीएस होण्याचे स्वप्न पूर्ण होते.
यूपीएससी परीक्षा तीन टप्प्यांत घेतली जाते – यूपीएससी प्रिलिम्स, मुख्य आणि मुलाखत.
UPSC परीक्षेला बसण्यासाठी तुमचे वय किमान 21 वर्षे असणे आवश्यक आहे. कमाल वयोमर्यादा 32 वर्षे आहे.
राखीव प्रवर्गातून आलेल्या उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाते. OBC, SC, ST साठी ही सूट 3 ते 5 वर्षांपर्यंत आहे.
नागरी सेवा परीक्षेतील प्रयत्नांची संख्या श्रेणीनुसार बदलते. जर तुम्ही सामान्य किंवा EWS श्रेणीतील असाल तर तुम्हाला 6 प्रयत्न मिळतील.
ओबीसी आणि अपंग प्रवर्गातील उमेदवारांना 9 वेळा परीक्षा देता येते. तर SC, ST उमेदवारांसाठी UPSC परीक्षेच्या प्रयत्नांवर मर्यादा नाही. तुम्ही तुमच्या कमाल वयोमर्यादेपर्यंत ही परीक्षा देऊ शकता.
बॅचलर पदवी म्हणजेच कोणत्याही विषयातील पदवी/पदवीधर असणे आवश्यक आहे. परंतु हे लक्षात ठेवा की तुम्ही ज्या विद्यापीठातून पदवी घेत आहात ते केंद्र किंवा राज्य सरकार, संसद किंवा यूजीसी कायदा 1956 च्या कलम 3 अंतर्गत मान्यताप्राप्त असले पाहिजे.