IPS Tushar Doshi: जरांगेंच्या मराठा आंदोलनावर लाठीचार्ज ते सातारा ZPच्या 'राड्या'त निलंबनाचे शिकार, कोण आहेत वादग्रस्त तुषार दोशी...?

Deepak Kulkarni

दोषींच्या निलंबनाचे आदेश

सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवेळी झालेल्या राड्याचे तीव्र पडसाद सोमवारी (ता.23) अधिवेशनात उमटल्याचं दिसून आलं. यात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.

Satara SP Tushar Doshi | Sarkarnama

आयपीएस अधिकारी

तुषार दोशी हे 2001 बॅचच्या महाराष्ट्र पोलीस दलातील एक वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत. 

Satara SP Tushar Doshi | Sarkarnama

पहिली पोस्टिंग

नाशिकमध्ये 2001 रोजी प्रशिक्षण घेतल्यानंतर तुषार दोशींची पहिली पोस्टिंग चंद्रपूरमध्ये करण्यात आली होती. त्यांच्याकडे राजुरा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

Satara SP Tushar Doshi | Sarkarnama

वादग्रस्त कारकीर्द

आयपीएस अधिकारी असलेल्या तुषार दोशींची कारकीर्द आत्तापर्यंत प्रचंड वादळी आणि तितकीच वादग्रस्त ठरली आहे. जालना येथील मराठा आंदोलकांवरील लाठीचार्ज प्रकरण त्यांना चांगलेच भोवले होते.

Satara SP Tushar Doshi | Sarkarnama

सक्तीच्या रजेवर

अंतरवाली सराटी येथील लाठीचार्जच्या घटनेनंतर राजकारण तापल्यानंतर तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं.

Satara SP Tushar Doshi | Sarkarnama

सातारा अधिक्षकपदी नियुक्ती

सक्तीच्या रजेनंतर दोशींकडे गुन्हे विभाग अधीक्षकपदाची जबाबदारी देण्यात सोपवण्यात आली होती. यानंतर त्यांची 23 मे 2025 रोजी सातारा अधिक्षकपदाचा पदभार स्विकारला होता.

Satara SP Tushar Doshi | Sarkarnama

चर्चेत...

पुणे पोलिस दलात सायबर विभागात उपायुक्तपदी राहिलेल्या तुषार दोशी हे 2018 मध्ये नवी मुंबईतील पोलिस उपायुक्तपदी कार्यरत असताना एजाज खान अटक प्रकरण, अश्विनी बिद्रे-गोरे हत्या प्रकरणामुळे चर्चेत आले होते.

Satara SP Tushar Doshi | Sarkarnama

प्रमुख शहरांमध्ये कामाचा अनुभव

दोशी यांनी चंद्रपूरमधील राजुरा हा नक्षलींचा प्रभाव असलेला भागात पहिली पोस्टिंग मिळाल्यानंतर लातूर शहर, सोलापूर, पुणे, नवी मुंबई या शहरांमध्ये काम करण्याचा अनुभव त्यांच्याकडे राहिला आहे.

Satara SP Tushar Doshi | Sarkarnama

महिला डॉक्टर प्रकरणातही आरोप...

फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणातही सातारा एसपी तुषार दोशी सुषमा अंधारेंनी आक्रमक भूमिका घेतली होती. तसेच यावेळी अंधारेंनी दोशी यांच्यावर गंभीर आरोप करताना “मृत महिलेला न्याय मिळवून देण्याऐवजी तिचं चारित्र्यहनन करण्यात आल्याचं म्हटलं होतं.

Satara-SP-Tushar-Doshi | Sarkarnama

NEXT: उद्धव ठाकरेंसह 9 जणांची आमदारकी जाणार; अधिवेशनात आज शेवटचा दिवस

1 (16).jpg | Sarkarnama
येथे क्लिक करा....