IPS Kamya Mishra : 'दबंग' पोलिस अधिकारी शिवदीप लांडे यांच्यानंतर आणखी एका IPS महिला अधिकाऱ्याचा राजीनामा मंजूर

सरकारनामा ब्यूरो

काम्या मिश्रा

2021 मध्ये बिहार केडर मिळवलेल्या बिहारच्या IPS अधिकारी काम्या मिश्रा यांच्या राजीनाम्याला मंजुरी दिली आहे.

IPS Kamya Mishra | Sarkarnama

शिवदीप लांडे

यापूर्वी 15 जानेवारी 2025 शिवदीप लांडे यांचा राजीनामा स्विकारण्यात आला होता, तर काम्या मिश्रा दुसऱ्या IPS अधिकारी आहेत. ज्यांच्या राजीनाम्याला मंजुरी मिळाली आहे.

Shivdeep Lande | Sarkarnama

राजीनामा स्वीकारला

बिहाराचे प्रसिद्ध कॅडर आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आयजी पदावर असताना त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता.

Shivdeep Lande | Sarkarnama

राजीनाम्याला मंजूरी

दुसऱ्या IPS अधिकारी ज्यांच्या राजीनाम्याला मंजुरी मिळाली आहे. त्या काम्या मिश्रा यांनी 2024 ऑगस्टला वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिला होता. त्यालाच आता सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे.

IPS Kamya Mishra | Sarkarnama

22व्या वर्षी IPS अधिकारी

मूळच्या ओडिशाच्या रहिवासी असलेल्या काम्या यांनी 2019 मध्ये अवघ्या 22व्या वर्षी UPSC परीक्षा उत्तीर्ण करत हिमाचल प्रदेश IPS कॅडर मिळवले होते.

IPS Kamya Mishra | Sarkarnama

लेडी सिंघम

2021 मध्ये त्यांची बिहार केडरमध्ये बदली झाली. यानंतर बिहारमध्ये त्यांनी दरारा निर्माण करत गुन्हेगारीवर आटोक्यात आणली. यामुळे त्यांची ओळख 'लेडी सिंघम' अशी झाली.

IPS Kamya Mishra | Sarkarnama

अवधेश सरोज यांच्याशी विवाह

काम्या मिश्राने अवधेश सरोज यांच्याशी विवाह केला होता. अवधेश देखील बिहारमध्ये 'आयपीएस' अधिकारी आहेत.

IPS Kamya Mishra | Sarkarnama

काय आहे कारण?

त्या त्यांच्या पालकांची एकुलती एक मुलगी असून त्यांचा मोठा व्यवसाय आहे. कोणीही अशी चांगली नोकरी अशीच सोडत नाही, मात्र त्यांनी अनेकवेळा सांगितले होते की, त्यांचे नोकरी करण्यासाठी मन नाही.

IPS Kamya Mishra | Sarkarnama

NEXT : राजकारणातही चौकार-षटकार ठोकणारे 'हे' 10 क्रिकेटपटू माहिती आहेत का?

येथे क्लिक करा...