Jagdish Patil
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान हे माजी क्रिकेटपटू आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे संस्थापक आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने 1992 च्या क्रिकेट विश्वचषकात विजय मिळवला.
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कॅप्टन मोहम्मद अझरुद्दीन हे काँग्रेसचे खासदार होते. त्यांच्या कारकिर्दीत 1993 हिरो कपमध्ये भारताने विजय मिळवला.
गौतम गंभीरने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो भाजप खासदार बनला. 2007 मधील T20 आणि 2011 एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारताला विजयी करण्यात त्याचं मोठं योगदान आहे.
इंग्लंडचे क्रिकेटपटू इयान बॉथम यांना जुलै 2020 मध्ये क्रॉसबेंच पीअर म्हणून हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये सन्मानित करण्यात आलं. त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये 1,000 धावा आणि 100 विकेट्सचे कामगिरी केली आहे.
नवज्योतसिंग सिद्धू यांनी क्रिकेटनंतर भाजपमधून राजकीय प्रवास सुरू केला. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले. भारतीय क्रिकेट संघातील आक्रमक फलंदाज अशी त्यांची ओळख आहे.
मनोज तिवारी यांनीही क्रिकेटनंतर TMC मध्ये प्रवेश केला. ते उत्तम फलंदाजीसाठी ओळखले जातात. त्यांनी आपल्या कारकिर्दीत विविध आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये देशाचं प्रतिनिधित्व केलं.
श्रीलंकेचे माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांनी क्रिकेटनंतर राजकारणात प्रवेश केला. संसद सदस्य ते मंत्री असा त्यांचा प्रवास आहे. त्यांनी 1996 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेला विजय मिळवून दिला.
कीर्ती आझाद यांनीही क्रिकेट कारकिर्दीनंतर भाजपचे खासदार म्हणून काम केलं. 1983 चा एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघात त्यांचा समावेश होता.
चेतन चौहान यांनी क्रिकेटनंतर भाजपचे खासदार म्हणून काम केलं. कसोटी सामन्यात सुनील गावस्कर यांच्यासोबत उत्तम सलामीचा फलंदाज म्हणून त्यांनी कामगिरी केली आहे.
श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्या याचा राजकीय प्रवास संसद सदस्य ते मंत्री असा आहे. त्याने श्रीलंकेला 1996 च्या विश्वचषक स्पर्धेत विजयी करण्यात महत्वाची भूमिका बजावली होती.