Deepak Kulkarni
आयपीएस अधिकारी पी. मोनिका या तेलंगणा राज्याच्या आहे. त्यांचं केडरही तेलंगणाच आहे.
मौनिका यांनी मेडिकल शिक्षणाची पार्श्वभूमी असतानाही यूपीएससी परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत यश मिळवलं. त्यांनी फार्माकोलॉजीत पदवी प्राप्त केली.
तेलंगणा केडरच्या आयपीएस अधिकारी असलेल्या मौनिका या त्यांच्या जबरदस्त फॅशन सेन्समुळे सोशल मीडियावर कायमच चर्चेचा विषय ठरत असतात.
पी. मोनिका यांनी त्यांच्या लग्नात बाकीचा अनावश्यक खर्च टाळून अवघे 2000 रुपये भरुन अगदी साध्या पद्धतीने नोंदणी विवाह केला. ज्याची समाजात प्रचंड चर्चा झाली.
मोठं स्वप्न पाहण्याची आवड अन् ते पूर्ण करण्यासाठी संघर्षाची वाटेवर चालण्याची तयारी यांनी मौनिका यांनी 2021 मध्ये त्यांनी 637 व्या रँकसह यूपीएससीची परीक्षा क्रॅक केली.
आयपीएस अधिकारी होण्यासाठी त्यांना कुटुंबातून मोठं पाठबळ मिळालं. त्यांच्या आई-वडिलांनी सतत प्रेरणा दिली.
मोनिका यांना फिटनेसविषयी त्या प्रचंड जागरुक आहेत. त्या धावपळीची ड्युटी असतानाही दिवसातील काही वेळ व्यायामासाठी काढत असतात.
मोनिका या सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. तसेच त्यांचे फोटोही पोस्ट करतानाच फिटनेसविषयीचं मार्गदर्शनही करतात.
छत्तीसगडच्या रायगड जिल्ह्यातील आयएएस अधिकारी युवराज मरमट यांनी आयपीएस अधिकारी मोनिका यांच्याशी लग्न केलं आहे. नाविन्यपूर्ण उपक्रम, सामाजिक कार्यात आवड असलेल्या या जोडप्यानं समाजात अवाढव्य खर्च टाळून केलेला विवाह आदर्श पायंडा समजला जात आहे.