Jagdish Patil
देशात असे अनेक मध्यमवर्गीय कुटुंबातले IAS-IPS आहेत, ज्यांनी खूप कष्ट करून UPSC क्रॅक केली आहे.
हरियाणाच्या नुह जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या पूजा या एकेकाळी शिकवणी घेऊन शिक्षणासाठी पैसे जमा करायच्या.
पूजा यांचं सुरुवातीचं शिक्षण हरियाणात झालं आहे. BA नंतर राज्यशास्त्रात MA ची पदवी मिळवली.
MA नंतर बायोटेक्नॉलॉजी आणि फूड टेक्नॉलॉजीमध्ये एमटेक केल्यानंतर त्यांना परदेशात नोकरी मिळाली.
कॅनडा आणि जर्मनीमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करताना त्यांच्या मनात UPSC करण्याचा विचार आला.
त्यानंतर परदेशातील नोकरी सोडून त्या भारतात आल्या आणि UPSC परीक्षेची तयारी सुरू केली.
2018 मध्ये दुसऱ्या प्रयत्नात पूजा या UPSC परीक्षेत 174 वा क्रमांक मिळवून IPS अधिकारी बनल्या.
पूजा या गुजरात केडरच्या IPS असून 2021 मध्ये त्यांनी IAS अधिकारी विकास भारद्वाज यांच्याशी लग्न केलं आहे.