IPS Poonam Dalal : धाडसी निर्णय..! अवघं 3 महिन्यांचं बाळ असताना दिली यूपीएससी

Deepak Kulkarni

प्रेरणादायी स्टोरी

तुमचं यश हे तुमच्या प्रयत्न, सातत्य,कष्ट,सराव,समर्पण आणि अभ्यास यांवरच अवलंबून असतं. ही एक अशीच एका महिला अधिकारीची प्रेरणादायी स्टोरी आहे.

IPS Poonam Dalal | Sarkarnama

दिल्लीत जन्म

दिल्लीत जन्म झालेल्या पूनम दलाल या हरियाणातील मध्यमवर्गीय कुटुंबातच वाढलेल्या आहेत.

IPS Poonam Dalal | Sarkarnama

प्राथमिक शिक्षकाची नोकरी

सुरुवातीला त्यांना नवी प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरीची संधी मिळाली. यावेळी नोकरी करता करता दिल्ली विद्यापीठातून पदवीही देखील मिळवली.

IPS Poonam Dalal | Sarkarnama

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये रूजू...

पदवीनंतर त्यांनी बँक पीओ परीक्षा दिल्या. विशेष म्हणजे त्या सर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्या. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून जॉईनही झाल्या.

IPS Poonam Dalal | Sarkarnama

इन्कम ट्रॅ्क्स विभागात

बँकेतील 3 वर्षांच्या सेवेनंतर पूनम या 2006 मध्ये इन्कम ट्रॅ्क्स विभागात अधिकारीपदावर रूजू झाल्या.

IPS Poonam Dalal | Sarkarnama

2007 मध्ये ​​लग्न...

पूनम यांनी त्यानंतर ​नवी दिल्लीतील सीमाशुल्क उत्पादन शुल्क विभागात कार्यरत असलेल्या असीम दहिया यांंच्यासोबत 2007 मध्ये ​​लग्न करण्याचा निर्णय घेतला.

IPS Poonam Dalal | Sarkarnama

पोलीस उपअधीक्षक पदावर नियुक्ती

लग्नानंतर त्यांनी तारेवरची कसरत करतानाच नोकरी आणि अभ्यास दोन्हीही सुरूच ठेवलं. अखेर 28 वर्षी यूपीएससीची सीएसई परीक्षा दिली. त्यानंतर त्यांनी हरियाणा PSC परीक्षा पास केली अन् त्यांची पोलीस उपअधीक्षक पदावर नियुक्ती झाली

IPS Poonam Dalal | Sarkarnama

9 महिन्यांच्या गर्भवती

आश्चर्य म्हणजे दुसऱ्यांदा यूपीएससी प्रिलिम्स देताना त्या 9 महिन्यांच्या गर्भवती होत्या.

IPS Poonam Dalal | Sarkarnama

बाळ अवघ्या 3 महिन्यांचं असताना...

प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी प्रिलिम पास केली. अन् बाळ अवघ्या 3 महिन्यांचं असताना त्यांनी UPSC परीक्षेत देण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि तो 897 गुणांसह 308 वा क्रमांक मिळवत यशस्वीही करुन दाखवला.

IPS Poonam Dalal | Sarkarnama

NEXT : पोलिस निरीक्षकाच्या अरेरावीमुळे त्यांचं मन दुखावलं अन्..! आता IPS होत दाखवून दिली ताकद...

IPS Siddharth Srivastava | Sarkarnama
येथे क्लिक करा...