Rashmi Mane
जर तुम्ही UPSC परीक्षा उत्तीर्ण करून IPS बनण्याचे स्वप्न पाहत असाल तर आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत.
आयपीएस अधिकारी होण्यासाठी काही शारीरिक निकष आहेत. निकष पूर्ण करणारे उमेदवारच आयपीएस अधिकारी होऊ शकतात.
IPS म्हणजेच भारतीय पोलिस सेवा म्हणजेच भारतीय पोलिस अधिकारी.
एक आयपीएस आपल्या कारकिर्दीत राज्य आणि केंद्र सरकारमध्ये विविध पदांवर काम करतो.
आयपीएस अधिकारी होण्यासाठी सर्वसाधारण श्रेणीतील पुरुषांची उंची किमान 165 सेमी असावी.जर पुरुष उमेदवार SC, ST किंवा OBC प्रवर्गातील असेल तर त्याची उंची किमान 160 सेमी असावी.
तर सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांची उंची किमान 150 सेमी आणि एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गातील महिलांची उंची 145 सेमी असावी.
दृष्टीबद्दल बोलायचे झाल्यास, सर्व श्रेणीतील उमेदवारांची व्हिजन 6/6 किंवा 6/9 असणे आवश्यक आहे. कमकुवत डोळ्यांची व्हिजन ऐवढी 6/12 किंवा 6/9 असावी.
IPS होण्यासाठी पुरुष उमेदवारांची छाती 84 सेमी असावी. तर महिलांची छाती 79 सें.मी. असावी.