Rajanand More
उत्तर प्रदेशातील बरेलीच्या दक्षिणच्या पोलीस अधिक्षक अंशिका वर्मा आणि संभलचे पोलिस अधीक्षक कृष्ण कुमार बिश्नोई हे दोघे २९ मार्च रोजी जोधपूर येथे विवाहबंधनात अडकणार आहेत.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विश्वासू अधिकारी म्हणून वर्मा आणि बिश्नोई यांची ओळख आहे. त्यामुळेच त्यांची महत्वाच्या जिल्ह्यांमधील कायदा-सुवव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
दोघांची पहिली भेट गोरखपूरमध्ये झाली होती. योगींच्या गोरखपूर दौऱ्यानिमित्त बिश्नोई बंदोबस्तासाठी असायचे. यावेळी वर्मा यांची नियुक्तीही याच जिल्ह्यात होती. या भेटीनंतर त्यांचे प्रेमात रुपांतर झाले.
शर्मा आणि बिश्नोई यांच्या विवाहाची चर्चा सध्या उत्तर प्रदेशसह देशभरात होत आहे. दोन्ही अधिकारी डॅशिंग अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे प्रामुख्याने पोलीस दलात याची जोरदार चर्चा सुरू आहे.
आयपीएस अधिकारी अंशिका वर्मा या मूळच्या प्रयागराजच्या आहेत आणि नागरी सेवेत येण्यापूर्वी त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण तिथेच पूर्ण केले. त्या २०२१ च्या तुकडीच्या अधिकारी आहेत.
अंशिका यांची लेडी सिंघम अशी ओळख आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी त्यांनी बरेलीत वीरांगना युनिट सुरू केले. राज्यातील अशाप्रकारचे हे पहिले युनिट ठरले. त्याचे बरेच कौतुक झाले. अत्यंत संवेदनशील प्रकरणे त्यांनी शिताफीने हाताळली आहेत.
कृष्ण कुमार बिश्नोई हे मूळचे राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यातील आहेत. २०१८ मध्ये आयपीएसमध्ये रुजू झाल्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेशात अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले.
अत्यंत कडक शिस्तीचे डॅशिंग अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिश्नोई यांना मुख्यमंत्री पदक मिळाले आहे. गुन्हेगारांवर वचक बसविण्यात आघाडीवर असलेल्या अधिकाऱ्यांमध्ये त्यांचे नाव घेतले जाते.