Deepak Kulkarni
आयपीएस अधिकारी प्राची सिंग या मूळच्या उत्तर प्रदेशमधील फतेहपूर येथील आहेत.
त्यांनी पहिल्याच प्रयत्नात 154 वी रँक मिळवत 2017 मध्ये यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्या.
श्रावस्तीच्या पहिल्या महिला 'एसपी' अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.
एक धडाकेबाज, दबंग आणि तितक्यात आक्रमक आयपीएस म्हणून उत्तर प्रदेश केडरमध्ये प्रसिध्द आहेत.
25 व्या वर्षी त्यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करत स्वत:चं भारतीय पोलिस सेवेचं स्वप्नं पूर्ण केलं.
लखनऊमध्ये असताना तेथील गुन्हेगारी प्राची यांनी अत्यंत कंट्र्रोलमध्ये आणली होती.त्याचमुळे योगी सरकारने त्यांना श्रावस्तीचे पोलीस अधीक्षक बनवले होते.
त्यांचे वडील पीसीएस अधिकारी तर आई उषा सिंग या तीन विषयांमध्ये एमए पदवी उत्तीर्ण आहेत.
प्राची यांनी अलाहाबाद विद्यापीठातून एलएलबी आणि भोपाळच्या राष्ट्रीय कायदा विद्यापीठातून एलएलएमपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
शहर पोलीस अधीक्षक IPS प्राची सिंग यांना 'प्लॅटिनम' पदक प्रदान करण्यात आले आहे. उत्कृष्ट सेवेबद्दल पोलीस महासंचालकांकडून हा सन्मान दिला जातो. त्यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन ब्रह्मास्त्र, सफाया या मोहिमा राबवण्यात आल्या.