सरकारनामा ब्यूरो
महिलांच्या सुरक्षा आणि सक्षमीकरणावर सातत्याने लक्ष देणाऱ्या IPS प्रीती यादव यांची सक्सेस स्टोरी...
हरियाणातील रेवडी या जिल्ह्यात प्रीती यांचा जन्म झाला आणि येथेच त्यांच बालपणही गेलं.
प्रीती यादव यांचे वडील चंदीगड येथे हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत.
लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असणाऱ्या प्रीती यांनी बारावीच्या परीक्षेत 98 टक्के गुण मिळवले होते.
प्रीती यांनी भूगोल या विषयात पदवी मिळवली आहे. त्यांनी या विषयात सुवर्ण पदकही पटकावले आहे.
पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत असतानाच त्यांनी UPSC ची तयारी सुरू केली. त्यासाठी त्यांनी मग हे शिक्षणही अर्धवट सोडले.
2019 मध्ये त्यांनी पहिल्यांदा UPSC ची परीक्षा दिली. पहिल्याच प्रयत्नात अवघ्या 22व्या वर्षी त्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली.
प्रीती यादव यांना मिळालेल्या गुणांमुळे त्यांची IPS साठी निवड झाली. प्रशिक्षणानंतर त्यांचं पहिलं पोस्टिंग ASP म्हणून सहारनपूर येथे करण्यात आलं होतं.