तुकाराम मुंढेंचाही रेकॉर्ड मोडला! मुख्यमंत्र्यांवर केली होती कारवाई! ‘लेडी सिंघम’ रूपा मौदगिल; 20 वर्षांत 40 बदल्या

Mangesh Mahale

तुकाराम मुंढे

सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या २१ वर्षांच्या प्रशासकीय सेवेत २५ बदल्या झाल्याची चर्चा असताना, रूपा मौदगिल यांचे नाव चर्चेत आहे.

IPS Officer Rupa Moudgil | Sarkarnama

40 बदल्या

रूपा मौदगिल यांच्या सुमारे २० वर्षांच्या सेवाकाळात तब्बल ४० बदल्या झाल्याचे सांगितले जाते.

IPS Officer Rupa Moudgil | Sarkarnama

कर्नाटक कॅडर

आपल्या कडक आणि बेधडक कार्यपद्धतीमुळे सातत्याने चर्चेत राहिलेल्या कर्नाटक कॅडरच्या IPS अधिकारी रूपा मौदगिल पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत.

IPS Officer Rupa Moudgil | Sarkarnama

कठोर भूमिका

रूपा मौदगिल यांची ओळख केवळ वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे नाही, तर प्रत्येक ठिकाणी घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे झाली आहे.

IPS Officer Rupa Moudgil | Sarkarnama

सहा महिने

त्यांच्या कारकिर्दीत अनेकदा अल्प कालावधीतच बदली झाली. काही ठिकाणी त्या सहा महिन्यांपेक्षाही अधिक काळ राहू शकल्या नाहीत.

IPS Officer Rupa Moudgil | Sarkarnama

शैलीत बदल नाही

बदली झाली म्हणून त्यांच्या कामाच्या शैलीत बदल झाला नाही. ज्या विभागाची किंवा परिसराची जबाबदारी मिळाली, तेथे त्यांनी कायदा-सुव्यवस्था, गुन्हेगारी आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर कठोर पावले उचलली.

IPS Officer Rupa Moudgil | Sarkarnama

मुख्यमंत्र्यांवरही कारवाई

मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री उमा भारती यांच्याविरोधात कारवाई करत अटक केली होती. त्यामुळे त्यांच्या धाडसी कार्यपद्धतीची देशभरात चर्चा झाली.

IPS Officer Rupa Moudgil | Sarkarnama

वादाच्या भोवऱ्यात

गुन्हेगारीविरोधात कठोर कारवाई करण्यासोबतच भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरही त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली. त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे अनेकदा त्या वादाच्या भोवऱ्यातही सापडल्या.

IPS Officer Rupa Moudgil | Sarkarnama

NEXT: स्वातंत्र्यदिनी मोदींचा Gen Z साठी मोठा संकल्प; AI ते रोजगाराच्या संधी, काय म्हणाले PM?

येथे क्लिक करा