सरकारनामा ब्यूरो
बिहार सरकारने आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची घोषणा केली होती. यात एकूण नऊ अधिकाऱ्यांचे ट्रान्सफर करण्यात आले आहे.
त्यापैकी एक नाव आहे आयपीएस अधिकारी संजय ए लाटकर यांचं.
झारखंडच्या अणुऊर्जा विभागात महानिरीक्षक (सुरक्षा) म्हणून संजय ए लाटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
लाटकर हे 1995 च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत.
गेल्या 7 वर्षापासून केंद्रीय प्रतिनियुक्तीवर होते. त्यानंतर ते (सीआरपीएफ) केंद्रीय राखीव पोलिस दलात (आयजी) पोलिस महानिरीक्षक या पदावर कार्यरत होते.
2021 ला त्यांची नेमणूक झारखंडच्या (एडीजी) अतिरिक्त पोलिस महासंचालक या पदावर करण्यात आली.
झारखंड आणि बिहारच्या नक्सलविरोधी अभियानाचे नेतृत्व करत त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे.
सीआरपीएफच्या सेवेत मोलाची कामगिरी बजावली त्यामुळे त्यांना विशिष्ट सेवा पदकांनी गौरवण्यात आले आहे.