Roshan More
तुमच्या दबावामुळे मी कुठलाही निर्णय बदलणार नाही, असे खडेबोल अलिगढचे एसएसपी संजीव सुमन यांनी हिंदुत्ववादी संघटनांना सुनावले. त्यामुळे ते चर्चेत आले आहेत.
मुस्लिम व्यापाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी संजीव यांनी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना अटक केली आहे. संघटनांचा आरोप आहे की पोलिसांनी निर्दोष नागरिकांना पकडले आहे.
हिंदुत्ववादी संघटनांनी सुमन यांच्या विरोधात आंदोलन केले. त्या आंदोलनाला समोरे जात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्यासाठी तुम्ही जबाबदार असाल असे खडेबोल सुनावत आपण दबावाला बळी पडणार नसल्याचे म्हटले.
संजीव सुमन हे मूळचे बिहारमधील खगडिया जिल्ह्यातले रहिवासी आहेत.
संजीव यांनी आयआयटी रुडकीय येथून बी.टेक केले.
बीटेकनंतर त्यांनी खासगी क्षेत्रात काम केले. मात्र, तेथे त्यांचे पण रमले नाही. त्यानंतर त्यांनी स्पर्धा परिक्षेची तयारी केली.
युपीएससी परीक्षा क्रॅक करत ते 2014 आयपीएस अधिकारी आहेत.
सुमन हे शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जातात. कोरोना काळात लग्नाला बंदी असताना पोलिस मित्राच्या लग्नाला गेलेल्या पाच पोलिस कर्मचाऱ्यांना पाच किलोमीटर धावण्याची शिक्षा केली होती.