Roshan More
बिहारमधील मराठी IPS शिवदीप लांडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
शिवदीप यांनी फेसबुक पोस्ट करत आपण राजीनामा देत असल्याचे सांगितले.
शिवदीप यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये एवढ्या वर्षात मी बिहारला माझ्या आणि माझ्या कुटुंबापेक्षा वरचढ मानले आहे, असे म्हटले आहे.
सरकारी कर्मचारी असताना माझ्या कार्यकाळात काही चूक झाली असेल तर मी त्याबद्दल माफी मागतो, असे देखील शिवदीप आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.
मराठी IPS शिवदीप यांनी राजीनामा दिला असला तरी ते महाराष्ट्रात परत येणार नाहीत. त्यांनी बिहारमध्येच राहण्याचा निर्णय घेतला आहे. बिहार हेच माझे कार्यस्थान राहील, असे शिवदीप म्हणाले आहेत.
शिवदीप लांडे हे माजी मंत्री विजय शिवतारे यांचे जावई आहेत. ममता शिवतारे यांच्याशी शिवदीप यांचा विवाह झाला आहे.
शिवदीप लांडे हे बिहारमध्ये दबंग IPS म्हणून परिचित आहेत. लग्नापूर्वी ते आपल्या पगारातील 60 टक्के रक्कम सामाजिक कामांसाठी दान करत होते.