Deepak Kulkarni
सिमाला प्रसाद या 2010 बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत.
सिमाला या खासदार डॉ. भागीरथ प्रसाद व साहित्यकार मेहरून्निसा परवेज यांची कन्या आहे.
मध्य प्रदेश केडरच्या IPS अधिकारी सिमाला प्रसाद या त्यांच्या सौंदर्यामुळे आणि डॅशिंग कामगिरीमुळे नेहमीच चर्चेत असतात.
आयपीएस अधिकारी सिमाला प्रसाद यांचा जन्म 8 ऑक्टोबर 1980 रोजी झाला.
सिमाला यांचं प्राथमिक,महाविद्यालयीन शिक्षण भोपाळ येथून झाले. यानंतर त्यांनी समाजशास्त्र या विषयात पोस्ट ग्रॅज्युशन केले.
कॉलेज सुरू असतानाच त्यांनी UPSC परीक्षेची तयारी सुरु केली होती. त्यांनी सर्वप्रथम मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि त्यात यश मिळवले.
सिमाला प्रसाद यांची 2011 मध्ये IPS म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी जबलपूरच्या पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी राहिले आहे.
सिमाला यांचे वडील भगीरथ प्रसाद हे IAS अधिकारी होते.
सिमाला यांना सुरुवातीपासून अभिनयाची आवड होती. अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.