Sunil Balasaheb Dhumal
एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्यानंतर आता त्यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा यांची राजकारणात एन्ट्री झाली आहे.
मलबार हिल परिसरात जोरदार शक्तिप्रदर्शन करत स्वीकृती शर्मा या आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
शर्मा यांच्या रॅलीत 50 गाड्या, 25 बसेस अन् 100 पेक्षा जास्त दुचाकींचा समावेश होता.
ठाण्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 'नंदनवन' या निवासस्थानी हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.
आगामी विधानसभा निवडणुकीत प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा इच्छुक आहेत.
त्या मुंबईतील अंधेरी पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारीत असल्याचे बोलले जात आहे.
मुंबई पोलिस दलात वादग्रस्त ठरलेले प्रदीप शर्मा एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीय मानले जातात.