सरकारनामा ब्यूरो
UPSC ची परीक्षा पास करणं तसं अवघडचं. पण कठीण परिस्थितीत यशाचा मार्ग काढणाऱ्या IPS तनुश्री यांची सक्सेस स्टोरी...
तनुश्री या 2016 च्या बॅचच्या IPS अधिकारी आहेत.
तनुश्री यांचा जन्म बिहारमध्ये झाला असून त्यांचे वडील सुबोध कुमार हे निवृत्त उपमहानिरीक्षक आहेत. त्यांच्या आई आणि बहीण सीआरपीएफमध्ये कार्यरत आहेत.
तनुश्री यांचे प्राथमिक शिक्षण बिहारमध्ये पूर्ण झाले. बोकारो येथील डीएव्ही पब्लिक स्कूलमधून त्यांनी पदवी मिळवली. त्यानंतर त्या UPSC परीक्षेची तयारी करण्याठी दिल्लीला आल्या.
2014 मध्ये त्यांची निवड RPF मध्ये करण्यात आली. परंतु त्या नोकरीस न जाता यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु ठेवायचा निर्णय घेतला.
2015 मध्ये त्यांच लग्न झाल. तरीही त्यांनी परीक्षेची तयारी सुरुच ठेवली. 2016 मध्ये UPSC ची परीक्षा दिली.
तनुश्री यांनी प्रशिक्षणासाठी हैदराबाद येथील पोलिस अकॅडमीमध्ये प्रवेश केला.
2017 मध्ये त्यांची निवड जम्मू काश्मीर येथे पोस्टिंग मिळाली. मेहनत आणि जिद्दमुळे त्यांना यश मिळाल .