Rashmi Mane
राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. जाणून घ्या कोण आहेत ते अधिकारी ?
मुंबई लोहमार्ग विभागाचे आयुक्त रवींद्र शिसवे यांची राज्याच्या गुप्त वार्ता विभागात सह आयुक्त म्हणून बदली.
अमरावतीचे पोलीस आयुक्त एन डी रेड्डी यांची नागपूर येथे सह पोलीस आयुक्त म्हणून बदली
निसार तांबोळी यांची राज्य राखीव पोलीस बल नागपूर येथे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.
राजीव जैन यांची सागरी विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बदली.
अभिषेक त्रिमुखे यांची विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशासन) म्हणून बदली.
निकम शारदा वसंत यांची अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदी नियुक्ती.
सुप्रिया पाटील यादव यांची विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापना) या ठिकाणी बदली करण्यात आली आहे.
राज्य सरकारकडून वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंह यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले आहेत. पण त्यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे जारी करण्यात येणार आहेत