सरकारनामा ब्यूरो
तेलंगणा केडरचे IPS अधिकारी विक्रम दुग्गल यांची आयजी (Inspector-General of Police) म्हणून बढती करण्यात आली आहे.
विक्रम दुग्गल हे तेलंगणा केडरचे 2007 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
केंद्रातील प्रतिनियुक्तीदरम्यान त्यांनी केलेल्या कामगिरीचा सन्मान म्हणून त्यांना ही बढती मिळाली आहे.
विक्रम दुग्गल यांनी 2007 ला UPSCची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर त्याची नियुक्ती IPS अधिकारी म्हणून करण्यात आली.
2018 ला त्यांनी पंजाब पोलिस डिपार्टमेंटमध्ये काम सुरु केले. त्यांचं पहिलं पोस्टिंग ASP म्हणून अमृतसर ग्रामीण येथे झाले होते. जुलैमध्ये त्यांना पटियाला पाठवण्यात आले.
विक्रम दुग्गल त्यांच्या धडाकेबाज कामगिरीसाठी ओळखले जात असून त्यांनी दुर्गम आणि आदिवासी भागात काम करताना तेथील नागरिकांच्या मनात सुरक्षेची भावना निर्माण केली.
त्यांनी रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या मतिमंद लोकांना राहायला घर दिले. कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच लोकांचा पोलिसांवर विश्वास निर्माण व्हावा, असे अनेक विक्रमी प्रकल्प त्यांनी राबवले आहेत.
विक्रम दुग्गल यांचे वडील कश्मीरी लाल दुग्गल हे पंजाब पोलिसमध्ये आणि पत्नी जतिंदर दुग्गल या Internal Revenue Service (IRS) अधिकारी आहेत.