सरकारनामा ब्यूरो
2006 बॅचचे विवेक राज हे मध्य प्रदेश केडरचे आयपीएस अधिकारी आहेत.
सुरुवातीला त्यांचे वजन 138 किलो होते. त्यामुळे त्यांना शारीरिक मर्यादा होत्या. दैनंदिन काम करतानाही त्याना अडचणी येत असत.
लहानापणापासूनच त्यांना वेगवेगळे पदार्थ खायला आवडत असे. पण नंतर त्याचा त्यांच्या शरीरावर परिणाम झाला आणि त्यांचे अचानक वजन वाढले.
यूपीएससी परीक्षेदरम्यान त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी अधिक बिघडत गेल्या.
आयपीएस प्रशिक्षणादरम्यान त्यांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागला. परंतु, जिद्द आणि चिकाटीने त्यांनी आपले वजन हळूहळू कमी केले.
दैनंदिन जीवनात चालणे, टेकड्या चढणे आणि पळणे यांसारख्या अनेक गोष्टींचा समावेश त्यांनी केला.
व्यायाम सुरु असतानाही त्यांनी आपल्या खाण्याच्या सवयींमध्ये जास्त बदल केला नाही. तरीही त्यांनी तब्बल 48 किलो वजन कमी केले.
विवेक राज आत्ता फिटनेस फ्रिक आयपीएस अधिकारी म्हणून ओळखले जात आहेत.