सरकारनामा ब्यूरो
शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये 16-24 डिसेंबर दरम्यान 'शांतता, पुणेकर वाचत आहेत!' हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
पुस्तक महोत्सवाच्या अनुषंगाने एका विश्वविक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
एनबीटी राष्ट्रीय पातळीवरचा पुस्तक महोत्सव
नॅशनल बुक ट्रस्ट (एनबीटी) यांच्यावतीने राष्ट्रीय पातळीवरच्या 'पुणे पुस्तक महोत्सव' या उपक्रमात जिथे असतील तिथूनच 'एक तास पुस्तक वाचनाचा' आनंद घेतला जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन कि बात' द्वारे मुलांना वाचनाचे महत्त्व सांगितले होते. यातून प्रेरणा घेऊन तीन हजारांहून अधिक पालकांनी आपल्या मुलांना गोष्ट सांगण्याचा चीनचा विश्वविक्रम तोडला आहे.
लहान मुलांबरोबर राजकीय नेत्यांनीही व्यस्त कामातून एक तास पुस्तक वाचून उपक्रमात सहभाग नोंदवला.
वाचनप्रेमी नेत्यांनी एक तास आपल्या आवडीची पुस्तके वाचली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी सहभाग नोंदवला.
चंद्रकांत पाटील यांनी पुस्तक वाचतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत माहिती दिली.