Sunil Balasaheb Dhumal
मुंबई महापालिकेच्या ठेवींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाहांचा डोळा असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला.
ठाकरेंनी केलेले आरोपांचे फासे आता त्यांच्यावर उलटण्याची शक्यता आहे.
मुंबईचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी माजी मुख्यमंत्री ठाकरेंच्याच काळात सर्वात जास्त ठेवी वापरल्याचे सांगितले.
कोविड काळात झालेला अधिकचा खर्च या मुदत ठेवीच्या मदतीने केल्याचा दावा चहल यांनी केला.
मुंबई महापालिकेचा चार्ज घेतला त्यावेळी 77 हजार कोटी ठेवी होत्या. आता तो आकडा 86 हजार कोटी झाल्याचेही चहल यांनी सांगितले.
इक्बाल सिंग चहल हे 1989 च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे IAS अधिकारी आहेत.
ते ठाणे आणि औरंगाबादचे जिल्हाधिकारी होते. गृह मंत्रालय, महिला आणि बालविकास मंत्रालय आणि पंचायती राज मंत्रालयात सहसचिव होते. महाराष्ट्राच्या जलसंपदा विभाग आणि नगरविकास विभागाचे प्रधान सचिव होते.
चहल यांनी कोविड काळात मुंबईत केलेल्या उपाययोजनांचे सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाने कौतुक केले होते.