Rashmi Mane
तमिळ सुपरस्टार थलपती विजय नवीन पक्ष काढणार अशी चर्चा सुरु होत्या. या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
शुक्रवारी (2 फेब्रुवारी) थलपती विजय यांनी आपला तमिझगा वेत्री कळघम (TVK) राजकीय पक्ष सुरू केला आहे.
2026 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
थलपती विजय म्हणाले की, राजकारण हा काही व्यवसाय नसून जनतेची सेवा आहे.
विजय हे तामिळनाडूतील एकमेव अभिनेते नाही जे चित्रपट जगतातून राजकारणात येत आहेत. त्यांच्या आधी दिवंगत एमजी रामचंद्रन आणि जयललिता हेही दिग्गज नेते होते.
थलपती विजय यांचे वडील एसए चंद्रशेखर हे प्रसिद्ध तमिळ चित्रपट दिग्दर्शक आहेत. आणि त्यांची आई शोबा चंद्रशेखर गायिका आहेत.
2023 मध्ये, थलपती विजयची एकूण संपत्ती 56 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 445 कोटी रुपये होती. अभिनेत्याचे वार्षिक उत्पन्न 120 ते 150 कोटी रुपये इतकी आहे.