Rashmi Mane
इराण आणि इराक संर्घषाचा भारताच्या तांदूळ व्यापाराला जबर फटका; शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर संकट.
इराण हा भारताचा तिसऱ्या क्रमांकाचा बासमती तांदूळ खरेदीदार आहे. भारताच्या बासमती तांदळाच्या निर्यातीपैकी 25% इराणला जातो.
सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय संघर्षामुळे इराणमधील पुरवठा साखळी कोलमडली असून
भारतातून निर्यात ३०% घटली आहे.
इराणमध्ये दर वाढले, भारतात मागणी कमी, साठा जास्त त्यामुळे स्थानिक बाजारात दर घसरण्याची शक्यता.
पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशातील शेतकरी संकटात बासमती हे त्यांचे प्रमुख निर्यात. पीक उत्पन्नावर मोठा परिणाम होणार.
इराणला बासमती निर्यात (टन/कोटी)
2022-23: 9.98 लाख टन / 7,838 कोटी
2023-24: 6.70 लाख टन / 5,626 कोटी
2024-25: 8.55 लाख टन / 6,374 कोटी
सध्या जहाजे ‘Cape of Good Hope’ मार्गे वळवली जात आहेत.
वेळेत 15-20 दिवसांची वाढ
खर्चात 40-50 % वाढ
भारतातून इराणला निर्यात होणाऱ्या गोष्टींमध्ये जवळ जवळ 50% पर्यंत घट होऊ शकते.